fbpx

आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाहीचं – पी. चिदंबरम

टीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आपल्या घरावर आयकर विभाग छापा टाकणार असल्याचा दावा करत, आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाहीचं हे आयकर विभागाला माहिती असल्याचे नुकतेच ट्विट केले आहे.

काय म्हणाले पी. चिदंबरम ?

‘चेन्नई आणि माझ्या शिवगंगा मतदारसंघातील घरावर आयकर विभाग छापा टाकणार असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. आम्ही शोध पथकाचं स्वागत करु. आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही हे आयकर विभागाला माहिती आहे. त्यांनी आणि इतर तपास यंत्रणांनी या आधीही आमच्या घरांची तपासणी केली असून त्यांचा हाती काही लागलेलं नाही. निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा छापा टाकला जात आहे’.

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ५२ ठिकाणांवर छापे घातल्यानंतर निवडणूक आयोगाने सरकारी संस्थांना मतदानपूर्व छाप्यांबाबत निष्पक्ष कारवाईची सूचना केली.