‘महात्मा गांधींच्या देशात नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटतं याच्याशी आपला काही संबंध नाही’

jitendra aavhad

मुंबई: लखीमपूर घटनेवरून देशभर संताप व्यक्त करण्यात आला. तर कॉंग्रेसकडून योगी आदित्यनाथ यांना भारताचे आधुनिक जनरल डायर म्हटले गेले. काल ११ ऑक्टोबररोजी महाविकास आघाडी सरकारने लखीमपुर घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या जालियनवाला बाग टीकेला प्रतिउत्तर म्हणून मावळच्या गोळीबाराची आठवण करुन दिली होती. आता यावरच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खणखणीत प्रतिउत्तर दिले आहे.

भाजपा लखीमपुर घटनेनंतर काही करणार नाही. मिश्रांना ते मंत्रिमंडळातून काढणार नाहीत, कारण त्यांचे संस्कार आणि संस्कृती तशी आहे. बापाला लाज वाटली पाहिजे माझा मुलगा असा वागूच कसा शकतो. अंगावर शहारा आणणारं ते दृश्य होतं. समोर माणूस दिसत असताना अंगावर गाडी घातली. एकाने तर रिव्हॉल्ववरने गोळी घातली खाली पडलेल्या व्यक्तीला. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

तसेच विरोधकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्यावे. त्यांनी मावळ काढावं किंवा काहीही काढावं. पण एखादया केंद्रीय नेत्याच्या मुलाने समोर दिसत असतानाही त्यांच्या अंगावर गाडी घालणं आणि परत दोन गाड्या त्या मृतदेहांवरुन जाणं याबद्दल भारतीय जनतेच्या मनात नक्की चीड आहे. भारतातील मानवी संस्कारात सुसंस्कृतपणा आहे. अहिंसेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महात्मा गांधींचा हा देश आहे. तेव्हा नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटतं याच्याशी आपलं काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शेतकरी कुठलाही असला तरी तो या देशातील आहे. तुम्ही खात असलेल्या पोळ्या तिथूनच आल्या आहेत. यातून तुमच्या लेखी शेतकऱ्यांची किंमत काय हेच दिसून येतं. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या