जळगाव : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे. यासारखा आज दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती, असे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते मात्र आदित्य ठाकरे हे तर तरुण होते.
आता संपूर्ण राज्यात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते तर कदाचित आज ही वेळ आली नसती. असा टोला शिंदे गटात सहभागी झालेले जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमचा राजीनामा घेण्याचा विषयच येत नाही. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही. आम्ही भगवा सोडलेला नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत आणि शिवसेनेचेच काम करत आहोत.
महत्वाच्या बातम्या:
- uday samant : आम्हाला गद्दार म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही – उदय सामंत
- Monsoon special | पावसाळ्यात चहाबरोबर ‘हे’ पदार्थ खाण्याची मजा काही औरच; वाचा रेसिपी
- Aditya Thackeray : “मी उत्तरं द्यावीत एवढी गद्दारांची लायकीही नाही”; आदित्य ठाकरे आक्रमक
- Deepali Sayed | शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे – दीपाली सय्यद
- Deepak Kesarkar : नेत्यांना अपमानित करून जनतेची दिशाभूल करू नका; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<