‘आम्ही बाबरी मशिद पाडली नाही, तर राम मंदिर जोडलं आहे’ ; उद्या बाबरी विध्वंस प्रकरणी येणार निकाल

babri mashid

अयोध्या : करोडो हिंदूंसह भारतीयांचे अनेक शतकांचे असलेले स्वप्न आता पूर्ण होत आहे. मागील वर्षाच्या अखेर राम जन्मभूमीबाबत निकाल लागल्या नंतर ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.

गेल्या वर्षाखेर रामजन्मभुमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या मंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा झाला होता. अयोध्या जमीन वादासह बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी सीबीआय चौकशी नेमण्यात आली होती. आता, उद्या ३० सप्टेंबर रोजी लखनऊ विशेष न्यायालय या प्रकरणी निकाल सुनावणार आहे.

बाबरी मशिद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली गेली होती. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपच्या तत्कालीन बड्या नेत्यांसह विश्व हिंदू परिषद व अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी मोर्चा बांधणी केली होती. आता तब्बल २८ वर्षांनंतर सीबीआय न्यायालय निकाल सुनावणार आहे. या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, महंत नृत्य गोपालदास, भगवान गोयल यांच्यासह ४८ जणांवर आरोप दाखल करण्यात आले होते.

आता या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांनी न्यायालयाचा निर्णय काही आला तरी जामीनासाठी अर्ज दाखल करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. ‘सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केलं आहे की तिथे आधी राम मंदिरच होते. मग आम्हाला का जामीन अर्ज करावा लागेल?’ असा सवाल या प्रकरणातील नेते करत असून दंड देखील भरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, ४८ आरोपींपैकी १७ जणांचे निधन झाले आहे. त्यामुळे उद्या निकाल काय येणार हे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-