आम्ही कधीच म्हटलं नाही भिडेंनी स्वत: दगडफेक केली, पण!- प्रकाश आंबेडकर

मुंबई: आम्ही कधीच म्हटलं नाही की, भिडेंनी स्वत: दगडफेक केली. पण दगडफेक करणारे संभाजी भिडे यांचे नाव घेत होते. त्यामुळे आमचा असा आरोप आहे की, या हिंसाचारामागे भिडे यांचीच चिथावणी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पुरावे दिले होते. ते पुरावे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर करावे. असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले.

‘कोरेगाव-भीमा दंगलीत दगडफेक करणारे संभाजी भिडेंचं नाव घेत होते, भिडे यांनीच चिथावणी दिली त्यामुळे हिंसाचार उसळला.’ असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले, दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंना क्लीन चिट दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून भिडेंना ‘क्लीनचीट’; भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही

bagdure

आजपर्यंतच्या तपासात संभाजी भिडे यांचा दंगलीत सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधीमंडळात एका प्रश्नांचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. कालच कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी काल मुंबईत भारिपकडून एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होत. या मोर्च्याला मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींविरोधात आतापर्यंत केलेल्या चौकशीत एकही पुरावा मिळालेला नाही. मात्र अजूनही चौकशी सुरु आहे.भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल करताना मी पहिलं, असं एका महिलेने सांगितलं होतं. त्यानुसार तक्रार दाखली केली. मात्र चौकशीतून अद्याप एकही पुरावा भिडे गुरुजींविरोधात मिळालेला नाही. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल भेट घेतली आणि या प्रकरणी भिडे गुरूजींच्या सहभागाचे पुरावे देतो असं सांगितलं. त्या पुराव्याचंही विश्लेषण केलं जाईल.

You might also like
Comments
Loading...