fbpx

आपण एक उत्साही वाचक आणि दयाळू नेता गमावला : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे जेष्ठ अरुण जेटली यांचे निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वीचं अरुण जेटली यांची प्रकृती खालावली होती. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनामुळे शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘भाजपाचे दिग्गज नेते श्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मनापासून दु: खी झाले आहे. आम्ही एक चतुर संसदपटू, उत्साही वाचक आणि एक दयाळू नेता गमावला आहे. मी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतो. त्यांचा आत्म्याला शांती लाभो असं शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झालं आहे. आजाराला त्यांनी नेटाने लढा दिला. निष्टावंत वकील, उत्तम संसद पटू आणि प्रतिष्टीत मंत्री, त्यांनी देशाच्या उभारणीसाठी मोठं योगदान दिले आहे. असे ट्विट केले आहे.