fbpx

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही राज्यातून भुईसपाट केल – गिरीश महाजन

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही राज्यातून भुईसपाट केले असून नव्या टीम सोबत काम करण्यास आता पुन्हा एकदा तयार असल्याचे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एक नव्या दमाची टीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आली आहे. या नवीन मंत्र्यांचा महाराष्ट्राला आणि त्यांच्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे. तेसच पुढील येणाऱ्या निवडणुकीला भाजपला याचा फायदा होणार असल्याचे महाजन म्हणाले.