कॉंग्रेसने आमदारांना कैद करून ठेवलं नसतं तर आम्ही सत्तेत आलो असतो – शहा

नवी दिल्ली : आमदारांना कैद करून ठेवलं नसतं तर आम्ही सत्तेत आलो असतो.जर ते मुक्त असते तर जनतेने त्यांना कुणाच्या बाजूने उभा रहायचं ते सांगितलं असत .आमच्यावर घोडेबाजाराचा केल्याचा आरोप करण्याआधी कॉंग्रेसने आमदारांना का डांबून ठेवलं हा प्रश्न राहुल गांधी यांना पत्रकारांनी विचारावा असं विधान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे.

कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या विरोधात कौल दिला. त्यांचे निम्म्याहून अधिक मंत्री पराभूत झाले. याच पराभवाचं काँग्रेसकडून सध्या सेलिब्रेशन सुरू आहे, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेसला लगावला आहे. काँग्रेस-जेडीएसची सत्ता स्थापन होत असताना कर्नाटकची जनता नव्हे तर केवळ काँग्रेस-जेडीएसच आनंद साजरा करीत आहेत, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

कर्नाटकात सरकार स्थानप करणार असल्याने आता काँग्रेसला सुप्रीम कोर्ट, ईव्हीएम आणि निवडणुक आयोग या गोष्टी चांगल्या वाटत आहेत. आमच्यावर घोडेबाजाराचाही आरोप लावण्यात आला. मात्र, काँग्रेसने संपूर्ण तबेलाच विकून खाल्ला आहे. आम्हाला हक्क असल्याने आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला होता.कर्नाटकमध्ये भाजापाला सर्वात मोठा पक्ष बनवून जनादेश काँग्रेसविरोधात दिल्याबद्दल मी कर्नाटकच्या जनतेचे आभार मानतो. भाजपा कर्नाटकात १३ जागांवर नोटापेक्षाही कमी मार्रिजनने हारले, यारुन जनता भाजपाच्या बाजूने होती हे कळते असेही यावेळी शाह यांनी सांगितले.

कर्नाटकमधील भाजपाचं सरकार अवघ्या 55 तासांमध्ये कोसळल्यानंतर शहा यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आणीबाणीवरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत, अशा तिखट शब्दांमध्ये शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.