आम्हाला उपवास करण्याची सवय आहे काँग्रेससारखी आमची फाईव्ह स्टार संस्कृती नाही

dilip-kamble
टीम महाराष्ट्र देशा: दोन दिवसांपूर्वीच सरकार विरोधात काँग्रेसकडून उपोषण करण्यात आले होते. मात्र उपोषणा आधी छोले भटूरेवर ताव मारणाऱ्या नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे काँग्रेसचे उपोषण म्हणजे केवळ मगरीचे अश्रू असल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली होती. आता सत्ताधारी भाजपकडून आज देशभरात संसदेतील गोंधळी विरोधकांच्या निषेधार्थ उपोषण केले जात आहे. मात्र या उपोषणाचा पुरता फज्जा उडताना दिसत असून भूक सहन न झालेले भाजप आमदार वेफर्सवर ताव मारतानाच व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे.
मात्र , हा व्हिडीओ जुनाच असून हा काँग्रेसचा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.
काँग्रेसने जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, हा खोडसाळपणा आहे, अशाप्रकारे केविलवाणा प्रयत्न आहे हा काँग्रेसचा, आम्हाला  उपवास करण्याची सवय आहे काँग्रेससारखी आमची फाईव्ह स्टार संस्कृती नाही असा आरोप सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलाय.