fbpx

आम्ही दिलेल्या कर्जमाफीमुळे विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ – दानवे

टीम महाराष्ट्र देशा- जालना , आम्ही दिलेल्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार असून सर्वसामान्य शेतकर्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याने विरोधकांबरोबरच मित्रपक्षात पोटशूळ उठला आह, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली. अंबड तालुक्यातील जामखेड येथे रविवारी भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.मोबाईलचे बटन दाबा व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची ऑनलाईन यादी पाहा, मग यावर बोला असे जाहिर अवाहन दानवे यांनी केले आहे. पूर्वीच्या सरकारने 60 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती, या कर्जमाफीमुळे शेतक-यांचा नव्हे तर बुडीत निघणा-या बँकांचा फायदा होत होताया वेळी आमदार नारायण कुचे यांनी सत्तेत असलेला मित्रपक्ष विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे पाप करत असल्याची टीका केली

2 Comments

Click here to post a comment