राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आम्ही माफ केलं- राहुल गांधी

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचं राहुल गांधी म्हणाले, ते सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ‘आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होतं’ असे बोलून राहुल गांधी भावुक झाले.

१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. आणि १९९१ मध्ये राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिलेने सुसाईड बॉम्बरने उडवलं होतं. चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत ही घटना घडली होती. एलटीटीईने ही हत्या घडवून आणली होती. राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची जन्मठेपेतून सुटका करण्याचा प्रस्ताव तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी मांडला होता. याला कॉंग्रेसने जोरदार विरोध केला होता.

bagdure

काय म्हणाले राहुल गांधी?

एखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती. राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो. ‘माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू होणार.’

You might also like
Comments
Loading...