‘अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद नको, त्याचा फटका तुम्हालाही बसणार’, मोदींचा पाकिस्तानला इशारा

narendra modi

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर केलेल्या आरोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी काय प्रत्यु्त्तर देतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी या संयुक्त राष्ट्र महासभेचं सत्र कोरोनामुळे प्रत्यक्षात आयोजित न करता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे मोदींच्या या भाषणाकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे.

मोदी म्हणाले की, ‘मी लोकशाही असलेल्या देशाचं नेतृत्व करत आहे. देशात अनेक भाषा, धर्म आहेत. तरी विविधतेत एकता हे आमचं देशाचं मोठं यश आहे. हे लोकशाहीचं यश आहे. भारताच्या लोकशाहीची ताकद ही आहे की रेल्वेस्थानकावर चहा विकाणारा मुलगा आज चौथ्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत बोलत आहे. जेव्हा जेव्हा भारताची प्रगती होते. तेव्हा जगाची प्रगती होते, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

‘आज जगासमोर अतिरेकी विचारसरणीचा धोका आहे. विज्ञानाधारित विवेकी विचारसरणीची जगाला आवश्यकता आहे. भारत अनुभवाधिष्टीत शिक्षणाला प्राधान्य देत आहे. आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना उत्तरं द्यायची आहेत. जेंव्हा निर्णय घ्यायची वेळ होती ज्यांच्यावर निर्णय घ्यायची जबाबदारी होती ते काय करत होते. अफगाणिस्तानच्या भुमीचा वापर दहशतवादाच्या प्रसारासाठी व्हायला नको. जे देश प्रतिगामी विचारसरणीने चालत आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे की दहशतवाद त्यांच्यासाठीही धोक्याचा असल्याचे मोदींनी सांगितले.

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद आणि दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो असे म्हणत पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या