‘आम्हाला जगाकडून लोकशाही, धर्मनिरपेक्षता शिकण्याची गरज नाही’

mohan bhagwat

गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आसामच्या विविध क्षेत्रात आणि अरुणचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरासारख्या इतर पूर्वोत्तमर राज्यांमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोहन भागवत यांनी बैठक घेतली. या बैठकीत संघटनेशी संबंधित तसेच कोरोना महामारी संदर्भात समाज कल्याण कामांचा आढावा व उपायांवर चर्चा करण्यात आल्याचं भागवत यांनी सांगितले.

गुवाहाटीत आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, जगाकडून आम्हाला धर्मनिरपेक्षता, सामाजिकता आणि लोकशाही शिकण्याची गरज नाही. आमच्या परंपरेत आणि रक्तात ते आधीपासूनच आहे. आमच्या देशाने त्याची अंमलबजावणी केली आहे आणि अजुनही देशात हे अस्तित्वात आहे.

देशात सीएए कायद्यामुळे कोणत्याही मुस्लीम व्यक्तीला त्रास होणार नाही. सीएए आणि एनआरसी यांचा हिंदू-मुस्लीम विभाजनाशी कोणताही संबंध नाही. राजकीय फायद्यासाठी काही लोकांकडून याला धार्मिक रुप दिलं जात आहे, असेही भागवत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP