मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज पवई मध्ये पार पडला. या मेळाव्याला देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी संभाजी राजेंना दिलेला शब्द पाळला नाही असं विधान संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. यावर आता रामदास आठवलेंनी या मेळाव्यात प्रतिक्रिया दिली आहे.
“संभाजी राजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहित नाही. शब्द जर दिला असेल तर उद्धव ठाकरे यांनी तो पाळायलायला हवा होता. परंतु संभाजी राजे हे देखील बीजेपीच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी बीजेपीला सोडून विचार करणं अत्यंत अयोग्य होते. बीजेपी सोबत राहायला पाहिजे होत. परंतु संभाजी राजेंनी असा निर्णय घेतला आणि शिवसेनेने त्यांना शब्द दिला होता असे त्यांचे म्हणणे आहे, दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं याची आम्हाला कल्पना नाही संभाजी राजे यांनी बीजेपी पासून दूर जायला नको होते”, असे रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –