वेगळया मराठवाड्याला भाजपचा पाठिंबा नाही-दानवे

मराठवाड्याचा विकास करणे हाच भाजपचा प्रमुख उद्देश

टीम महाराष्ट्र देशा – वेगळया मराठवाड्याला भाजपचा पाठिंबा नाही असा स्पष्ट निर्वाळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला आहे .नागपूर येथे भाजपच्या आढावा बैठकीनंतर रावसाहेब दानवे हे पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्याकडे उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे ते वेगळे राज्य होऊ शकत नाही, असेही दानवे म्हणाले. सध्या काही जणांना स्वतंत्र मराठवाड्याची उबळ आली आहे. भाजपचीही छोट्या राज्यांची संकल्पना आहे, परंतु एका गावाचे राज्य कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्याचा विकास करणे हा आमचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.