‘आम्ही पवारांसारखं आयतं राज्यसभेत जाऊन बसत नाही आणि माघारही घेत नाही’

शरद पवार यांच्यासारखं आयतं राज्यसभेत जात नाही किंवा माढ्यातून माघारही घेत नाही, अशा शब्दात शरद पवार चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेत नागरिकांच्याही भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.

संजय शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपद घेतलं. त्यानंतर दर महिन्याला मुंबईला जाऊन त्यांनी वाटेल तेवढा निधी घेऊन आले. असं असताना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आपण माढातून लढायला तयार असल्याचं सांगून दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशा माणसाला गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? असा सवालही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

याचवेळी शरद पवारांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी, आपण ५ जिल्हे, ५८ विधानसभा, १० लोकसभा आणि ६ लाख मतदार संख्या असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. २००८ साली झालेल्या निवडणुकीवेळी आपण तब्बल एक लाख किमी प्रवास केला. शरद पवारांसारखं राज्यसभेत जाऊन बसत नाही किंवा माढ्यातून माघारही घेत नाही, अशी बोचरी टीका केली.

 

2 Comments

Click here to post a comment
Loading...