आम्ही तानाजी सावंत यांच्या म्हणण्याला महत्व देत नाही : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देऊ नये, सत्तेचा माज, मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे, अशी धमकीच रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना भाजपला दिली होती. यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते पुण्यातील मेळाव्यात बोलत होते.

मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाचा वाद उद्धव ठाकरे आणि भाजपचे श्रेष्ठी सोडवतील शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या म्हणण्याला आम्ही महत्व देत नाही असंही त्यांनी सांगितलं. तसेच पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून दरोरोज मुख्यमंत्री पदासाठी दावे केले जात आहेत. मात्र यावर दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी मौन बाळगून आहेत. तरी देखील युतीच्या अन्य नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी होत आहे. पुण्यात देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत भाष्य केले आहे. तर शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या म्हणण्याला आम्ही महत्व देत नसल्याच म्हंटल आहे.