सरकारवर टीका करणारे देशद्रोही ठरवले जातात : शबाना आझमी

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या निर्भीड वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. ‘सरकारवर टीका करणाऱ्या कोणालाही देशद्रोही ठरवले जाते’ अस म्हणत ज्येष्ठ अभिनेत्री शबानाने सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात शबाना आझमीने आपले मत व्यक्त केले. यावरून त्यांच्यावर ट्विटरवर ट्रोल होत आहे.

Loading...

जर आपल्याला देशाच्या कामकाजात त्रुटी आढळून येत असतील, तर त्यावर खुलेपणाने चर्चा करणं हे गरजेचं आहे, कारण ते देशहितासाठी महत्वाचं आहे. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले नाही, तर परिस्थितीमध्ये कधीच सुधारणा होणार नाही”, असं शबाना आझमी यावेळी म्हणाल्या.

इतकच नव्हे तर देशात सध्या असे वातावरण आहे की जर कोणीही सरकारवर टीका केली तर त्याला राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले जाते तर याला कोणीही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असे म्हणत शबानांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाना साधला. तर यावर अनेकांनी ट्विटर वरून त्यांना ट्रोल केले आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेता आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहदेखील उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...