‘आम्ही कुरियरने मुख्यमंत्र्यांना कांदा पाठवला,त्यांनी फुकट मिळतोय म्हणून घेऊन टाकला’

टीम महाराष्ट्र देशा- कांद्याचे दर पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कांद्याचे फुकट वाटप करण्यात आले, कांदा कुरियरने मुख्यमंत्र्यांना पाठवला मात्र त्यावर सरकारला काहीही फरक पडला नाही. उलट फुकट मिळतोय म्ह्णून घेऊन टाकला. आघाडी सरकारच्या काळात कांद्याला ३५० रुपये अनुदान दिले होते मात्र आता केवळ २०० रुपये अनुदान सरकारने दिले. कांद्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तनाची सभा आज निफाड येथे पार पडली. या सभेत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारवर आपल्या खास शैलीत टीका केली देशातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अन्नदाता शेतकऱ्यांचा! शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. भाजप सरकारने नाशिकमध्ये पालकमंत्री जळगाव जिल्ह्यातून आयात केले. नाशिकरांनी पालकमंत्री बनवण्यासाठी एकाही भाजपच्या नेत्याला मतदान दिले नव्हते का, असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

या सभेस ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील , आ. जितेंद्र आव्हाड , महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान , महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जयदेव गायकवाड, दिपीका चव्हाण,माजी आमदार दिलीप बनकर, जयवंतराव जाधव, ओबीसी सेलचे ईश्वर बाळबुधे,जलचिंतन सेलचे राजेंद्र जाधव, प्रदेश पदाधिकारी बापू भुजबळ, नानासाहेब महाले,श्रीराम शेटे, अजिंक्य राणा पाटील,अर्जुन टिळे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, डॉ.भारती पवार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे,युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा सदस्य अमृता पवार, परिषद शिवाजी सहाणे,सचिन पिंगळे, नितीन पवार आदी उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment