आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही

टीम महाराष्ट्र देशा : सर आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही. आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही. येथे प्रचंड भीती वाटत आहे. मी विद्यार्थी आहे आणि मला शिकण्यासाठी कॉलेजलाही जाता येत नाहीये. आमचे भाऊ आमचं संरक्षण करत आहेत. याठिकाणी आमची दुकानं जाळण्यात आली आहेत. आमची घरं जाळली गेली आहेत.अशा स्वरात दंगल पीडित भागात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या समोर आपबिती बया करण्यात आली.

दिल्लीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वतः हिंसाचारग्रस्त भागात पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. यावेळी अनेक पीडितांनी त्यांच्यासमोर आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी एका महाविद्यालयीन युवतीने देखील आपलं घरं-दुकान जाळल्याचं सांगत पोलीस त्यांचं काम करत नसल्याची हतबलता व्यक्त केली. यावर अजित डोभाल यांनी पीडित विद्यार्थीनीला सुरक्षेची हमी देत शब्द दिला

Loading...

पीडित विद्यार्थीनीच्या व्यथेनंतर अजित डोभाल म्हणाले, “तुम्हाला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमची सुरक्षा ही सरकारची, पोलिसांची आणि आमची जबाबदारी आहे. प्रत्येकजण तुमच्यासोबत आहे.” यावर संबंधित विद्यार्थीनीने पोलीस देखील त्यांचं काम करत नसल्याची तक्रार केली. तसेच या परिस्थितीवर ठोस पावलं उचलण्याची विनंती केली.

हिंसेत होरपळणाऱ्या पीडितांनी अजित डोभाल यांच्यासमोरच हा हिंसाचार अमित शाह आणि भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर झाल्याचा गंभीर आरोपही केला. यावेळी संतप्त पीडितांनी हिंदुस्थान जिंदाबाद, अजित डोभाल वापस जाओ, ‘दिल्ली पोलीस हाय हाय’च्या घोषणाही दिल्या.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं