एनडीएत नारायण राणेंच स्वागतच करू – रावसाहेब दानवे

वेबटीम: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पक्षाची ध्येय-धोरणं एनडीएसाठी अनुकूल असतील तर त्यांचं एनडीएत स्वागत केल जाईल अस सांगत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राणे यांना खूल निमंत्रण दिले आहे. यावरूनच राणेंनी पक्ष स्थापन केल्यानंतर भाजपने त्यांच्यासाठी एनडीएची दारे उघडण्यास सुरुवात केल्याच दिसून येत आहे.

कॉंग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याच बोलल जात होते. मात्र भाजपने राणे थेट प्रवेश न देता त्यांच्या नवीन पक्षाला एनडीएमध्ये सामावून घेण्याची खेळी खेळल्याच आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे आता येत्या काळात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सहभागी होईल तसेच त्यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.