fbpx

आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही; राठोडांचा हल्लाबोल

अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त मेळाव्यात शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. ‘आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही. मागच्या साडेचार वर्षात ‘त्यांच्या’मुळेच नगरचे नाव देशात खराब झाले असा आरोप राठोड यांनी आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीवर केला आहे.

पुढे बोलताना राठोड म्हणाले,ते स्वतःला डॉक्टरही समजतात व उपचार करताना आणि मुळापासून आजार काढताना माणसांना मारूनच टाकता’, अशी शेलक्या शब्दात टीका अनिल राठोड यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली .

अनिल राठोड हे सध्या शिवसेनेचे उपनेते आहेत व ते सलग २५ वर्ष आमदार होते. शिवसेनेची संपूर्ण अहमदनगर शहरासह जिल्ह्याची जबाबदारी अनिल राठोड यांच्या खांद्यावर आहे. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारासाठी दोन्हीही पक्ष कामाला लागले आहेत. तर सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका सुरु आहेत.