श्रद्धेच्या नावाखाली हिंसा खपवून घेणार नाही: मोदी

man ki baat modi

भारत हा अहिंसावादी देश असून श्रद्धेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेणार नसल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात मधून बोलताना सांगितल आहे. आज सकाळी मन कि बात मधून देशाला संबोधित करताना मोदी यांनी बाबा राम रहीम याला दोषी ठरवण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसेची निंदा केली आहे. सर्वांनाच न्याय मागण्याचा अधिकार आहे मात्र नागरिकांनी कायदा हातात घेणं चुकीचं असल्याचही मोदी म्हणाले आहेत