देशात रामराज्य येवून देणार नाही – आनंदराज आंबेडकर

Anandraj ambedkar

टीम महाराष्ट्र देशा: देशात असणाऱ्या मनुवादी सत्ताधाऱ्यांचे दोन अजेंडे आहेत. एक म्हणजे राममंदिर बांधणे आणि देशात रामराज्य आणणे, मात्र ज्या रामाने पत्नीचा त्याग केला तिला जाळून मारले त्या रामाचे राज्य देशात येवून देणार नसल्याच विधान भारतीय बौध्दजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या मनुस्मृतीच्या दहनाचा ९० वा वर्धापन दिन आज महाड येथे साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी आंबेडकरी जनतेला आवाहन करत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात आपण विभागले गेलो. त्यामुळे आपण काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याची गरज आहे. सध्या आंबेडकरी जनता तूकड्यांमध्ये वाटली गेली नसल्याने सत्ता येऊ शकत नसल्याचे सांगितले. तसेच हि परिस्थिती बदलण्यासाठी पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याच मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...