‘आम्ही एका मर्यादेपर्यंतचं सक्ती करू शकतो’, कसोटी रद्द करण्यावर गांगुलीचे स्पष्टीकरण 

team india

नवी दिल्ली : इंग्लंड दौरा मध्यंतरी स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ आयपीएलच्या उर्वरित संन्यासाठी दुबईला झाला. पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार होता, परंतु कोरोनाचे संकट पाहता तो रद्द करावा लागला. त्यानंतर मात्र आयपीएल साठी भारतीय खेळाडूंनी इंग्लंड दौरा रद्द केला असल्याची चर्चा रंगली होती.

यावरच आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने यांनी स्पष्टीकरण दिले आहे, ते म्हणाले, ‘कोणत्याही खेळाडूला त्याच्या संमतीशिवाय मैदानात उतरवू शकत नाही. कोरोनाच्या काळात कोणत्याही खेळाडूला फक्त काही प्रमाणात खेळण्यास भाग पाडले जाऊ शकते.

गांगुली म्हणाले, ‘गेल्या 18 महिन्यांत कोविड -19 मुळे मालिका रद्द करणे ही प्राथमिकता होती. बीसीसीआयने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्यांची घरची मालिका रद्द केली, ज्यामुळे 40-50 दशलक्ष पौंड (सुमारे 407 कोटी ते 509 कोटी) नुकसान झाले. भविष्यात अशा प्रकरणांमध्ये ठोस वैद्यकीय सल्ला मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून टीममध्ये कोविडची प्रकरणे आढळली तरीही मालिका सुरू ठेवता येईल.

गांगुली पुढे म्हणाले की, ‘बीसीसीआय निराश आहे की हा सामना आयोजित केला जाऊ शकला नाही. याचे एकमेव कारण कोविड -19 चा उद्रेक आणि खेळाडूंची सुरक्षा होती. आम्ही त्यांना (खेळाडूंना) फक्त एका मर्यादेपर्यंत सक्ती करू शकतो. महामारी इतकी वाईट आहे की कोणीही एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ‘

महत्वाच्या बातम्या :