शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास सरकारला फरक नाही – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत असल्याच्या चर्चेंना पेव फुटला आहे. अशातच आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाला सज्जड दम दिला आहे.

जळगाव मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारमधून बाहेर पडू शकणार नाही , आणि पडलीच तरी सरकारवर परिणाम होणार नाही, सरकार वाचविण्याची यंत्रणा सरकारकडे उभी असेल , विदाउट शिवसेना सुद्धा सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करणार आहे.

आता चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला शिवसेनेच्या गोटातून काय उत्तर येते हे पाहण्यासारख असणार आहे.