आम्हाला जातिवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले; दानवेंचा पवारांना टोला

Raosaheb_Danve

टीम महाराष्ट्र देशा – आम्हाला जातिवादी म्हणणारे सर्वच्या सर्व आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपचे रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना हाणला आहे. शरद पवार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आधी आमच्यासोबत होते. त्यामुळे आता त्यांना आम्हाला जातिवादी म्हणण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.शहरातील जबिंदा लॉन्सवर रविवारी झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात ते बोलत होते.

दानवे म्हणले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा व दादर लोकसभेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला. आता त्यांच्या अनुयायांना मत मागण्याचा अधिकार काँग्रेसला आहे का?.

शिवसेना आणि भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र यायला हवे. २०१९ ची मॅच आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

वंचित समाजाला न्याय हवा असेल तर त्यांनी माझ्यासोबत यावे, असे म्हणत आठवले यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता टीका केली. ऐक्याची हाक देणाऱ्यांनी ऐक्याला विरोध करणाऱ्या नेत्यांना जिल्हाबंदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी भागवत कराड, आमदार अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे यांची उपस्थिती होती. तर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आदींनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. मंचावर महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजा सरवदे, जित आठवले, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, जालिंदर शेंडगे, बाळकृष्ण इंगळे, किशोर थोरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, विजय मगरे, कमलेश चांदणे यांची उपस्थिती होती. महिला आघाडीच्या अध्यक्ष सीमा आठवले, कांतीकुमार जैन, माजी आमदार अनिल गोंडाणे, ब्रह्मानंद चव्हाण, दौलत खरात, धम्मानंद मुंढे, गौतम सोनवणे, चंद्रकांत चिकटे, मिलिंद शेळके, पप्पू कागदे, श्रावण गायकवाड आदींची मेळाव्यात भाषणे झाली.Loading…
Loading...