‘महाविकास आघाडी जनतेच्या विकासासाठी एकत्र; जनता हीच सरकारचा केंद्रबिंदू’

blank

टीम महाराष्ट्र देशा – महाविकास आघाडी हे एक नवीन स्वप्न असून आम्ही जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असून, हीच खरी लोकशाही आहे ज्यात जनता आणि जनतेचा विकास हे या सरकारच्या केद्रस्थानी आहे असं स्पष्टीकरण कॉंग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

लोकशाहीत जनता ही केंद्रस्थानी असते. महाराष्ट्रात आम्ही तीन वेगवेगळे विचारधारेचे पक्ष जनतेच्या विकासासाठी एकत्र आलो असून हीच खरी लोकशाही आहे असाही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

महाविकास घडी एक नवीन स्वप्न, नवीन वाचन आपण महाराष्ट्राच्या जनतेला दिला असून हेच लोकशाहीच वैशिष्ट्य आहे जिथे सगळे जन स्वताची विचारसरणी बाजूला ठेऊन जनतेच्या मुद्ध्याना प्राधान्य देतात.

कोणत्याही राजकारणाच्या चौकटीत न अडकता लोकांच हिथ साधनं हा आमचा केंद्रबिंदू आहे . लोकं हीच आमचा केंद्रबिंदू आहे, आणि त्यांना समोर ठेउनच आम्ही पाच वर्ष सरकार चालवू असाही शिंदे म्हणाल्या .