मुंबई: शरद पवार हे नास्तिक आहेत त्यांना हिंदू धर्माविषयी आस्था नाही. अशी वारंवार मनसेकडून शरद पवारांवर टीका केली जाते. आता मनसेसह भाजपही याला चांगलाच प्रतिसाद देत आहे. ‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवरून शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणाचा व्हिडिओ भाजपने ट्विट केला आहे.
“शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवारसाहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!” असे भाजपने ट्विटमध्ये म्हटले आहे.
शरद पवार यांचे भाषण –
साताऱ्यातील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी जातीयवादासंदर्भात बोलताना जवाहर राठोड यांच्या एका कवितेचा उल्लेख केला. मी पूर्वी जेव्हा औरंगाबादला जायचो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये उपेक्षित समजातली काही मुलं तिथे शिकायची. शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही ही मुलं उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड नावाचा एक कवी त्याकाळी वसंतराव नाईक कॉलेजमध्ये शिकवायचा.
नास्तिक @PawarSpeaks यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात.
पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते.
पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा! pic.twitter.com/KnTtjUuTHo
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 11, 2022
त्याने त्याच्या कवितेत असं म्हटलंय की, “आम्ही आमच्या चीनी हाथोड्यापासून बनवलेल्या जात्यामुळे आज अनेकांचं पोट भरत आहे. या सोबतच आम्ही अनेक गोष्टी बनवल्या. तुम्ही ज्यांची पूजा करता ते ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही आमच्या चीनी हातोड्यापासून घडवल्या. त्या तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि आता आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही”, असे जवाहर राठोड यांनी आपल्या कवितेत म्हटल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. यावरून शरद पवारांवर भाजपकडून टीका होत असताना पाहायला मिळत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रियां काय येईल पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –