रोहतक : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. अडीच महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. २६ जानेवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर या आंदोलनावरून नवं वादंग निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेलं भाष्य यावर देशातील काही दिग्गज कलाकारांनी व क्रिकेटर्सनी दिलेलं उत्तर, टूलकिट प्रकरण यामुळे या आंदोलनाने वेगळं वळण घेतल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आता हे शेतकरी आंदोलन देशव्यापी करण्याची तयारी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सुरु केली आहे. रोहतकमधील सांपला जिल्ह्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत यांनी हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशनंतर आता पश्चिम बंगालमध्ये किसान महापंचायत घेण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीकास्त्र सोडलं.
‘श्रीराम रघुवंशी होते आणि आम्ही त्यांचेच वंशज आहोत. भाजपचा श्रीरामचंद्रांशी काहीही देणे घेणे नाही. भाजपवाल्यांनी महात्मा गांधी आणि रामभक्त हनुमान यांनाही आंदोलनजीवी करून टाकले आहे. ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर माफी मागायला हवी,’ असं भाष्य राकेश टिकैत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतंत्र भारतात प्रथमच ज्या महिलेला फाशी दिली जाणार आहे तिने जाणून घ्या काय केलाय गुन्हा !
- पवारांनंतर आता उदयनराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- शिवसेनेत प्रवेश केलेल्या राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांना नोटिसा
- नामांकित उद्योजकाला महिलेसह दोघांची खंडणीची मागणी