‘हम तो है दुनिया के बॉस’ ; ख्रिस गेल ताफ्यात दाखल झाल्यानंतर पंजाब किंग्जचा प्रतिस्पर्धी संघांना इशारा

ख्रिस गेल

मुंबई : भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सगळे संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. प्रॅक्टिसचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. यावर्षी सगळे संघ ट्रॉफी जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत. यावर्षी सगळेच संघ भक्कम असल्याचे दिसून येत आहे.

आयपीएलला एकच दिवस शिल्लक राहिला आहे. या आधीच विरोधी संघ प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा देताना दिसत आहेत. अशातच पंजाब किंग्जने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसत आहे, पंजाब किंग्जचा आक्रमक खेळाडू ख्रिस गेल  आपला क्वारन्टाईन काळ पूर्ण करून संघात परतला आहे.

ख्रिस गेल आयपीएलच्या मैदानात धुमधडाका करण्यासाठी सज्ज आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या गेलचा काल 7 एप्रिल रोजी क्वारन्टाईन पिरीयड पूर्ण झाला. पंजाब किंग्जने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. क्वारन्टाईनचा खेळ संपला. ‘द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल तुमचा फेव्हरेट ख्रिस गेल बाहेर आलाय… ‘ असे कॅपशन या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडीओ शेअर करून प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या