आम्ही भाजपाचे निष्ठावान, तुमचे पक्षाला योगदान काय; भाजप कार्यकर्त्यांचा सवाल

टीम महाराष्ट्र देशा : नेवासा तालुक्याचे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष रामकीसन गर्जे यांनी आमदार मुरकुटेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ‘कुंकू भाजपाचे संसार राष्ट्रवादी व काँग्रेससोबत हा तुमचा बेगडीपणा आता उघड होत असून तुम्हीच राष्ट्रवादी व काँग्रेसचे हस्तक आहात. आम्ही भाजपाचे खरे निष्ठांवत असून भाजप पक्ष व भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना संपवायला निघालेल्या आमदारांची भांडाफोड भाजपाच्या नेत्यांसमोर केल्याने ते आगपाखड करत आहेत अशी टीका रामकीसन गर्जे यांनी आमदार मुरकुटेंवर केली आहे.

गेल्या साडेचार वर्षांत भाजपाची एकही शाखा तालुक्यात न काढणाऱ्या आमदारांचे पक्षाला योगदान काय व भाजपाचे तिकीट मागण्याचा त्यांना अधिकारच काय असा सवालही गर्जे यांनी केला आहे. आम्ही भाजपाचे पुर्वीपासूनच निष्ठावान आहोत आणि पुढेही राहणार आहोत पण तुम्ही ऐनवेळी भाजपाकडे आलात आम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान करत गडाखांचा पराभव करून तुम्हाला निवडूण दिले पण तुम्ही नंतर भाजपाशी बेईमानी करत गडाख-घुलेंची संगत धरली.

Loading...

शनिशिंगणापुर देवस्थान विश्वस्त मंडळ निवडीत ,मुळा व ज्ञानेश्वर कारखाना निवडणुकीत तुम्हीच कोणाचे हस्तक झालात असा प्रश्न गर्जे यांनी केला आहे. आम्ही आर्थिकदृष्टया सक्षम आहोत आणि भाजपाशीही प्रामाणिक असून आम्ही भाजपाचेच हस्तक आहोत तुमच्या सारख्या छुप्या युत्या करत राष्ट्रवादी व काँग्रेसचे हस्तक आहात तसे आम्ही नाहीत..

तुम्ही तालुक्यात भाजपाला संपवायला निघाल्याने पक्षहितासाठी आम्ही सावध होत नेत्यांच्या कानावर घातले तर बिघडले कुठे आज भाजपाच एकही प्रमुख कार्यकर्ता तुमच्या सोबत का नाही याचे आत्मपरीक्षण करा असा सल्ला देत गर्जे व ताके यांनी भाजपाच्या तिकीटावर आमदार झाल्यानंतरही तुम्ही पत्नीला काँग्रेस पक्षातच ठेवले.पती भाजपाचा आमदार तर पत्नी काँग्रेसची जिल्हा परिषद सदस्य हा प्रकार राज्यात ऐकमेव नेवासा तालुक्यातच दिसला.

आमदारांनी पक्ष सांभाळायचे सोडून नातेगोते सांभाळल्याने तालुक्यात भाजपाची वाताहत होऊ नये म्हणुन आम्ही पक्ष नेत्यांकडे रास्त भूमिका मांडली तर बिघडले कोठे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची एकच जागा येते तीही राष्ट्रवादीच्या पडदयामागच्या खेळीतून तर पंचायत समितीतही घरातलाच एकमेव सदस्य असेच असेल तर तालुक्यात पक्ष राहणारच कसा अशी चिंता व्यक्त करतांनाच गेल्या विधानसभा निवडणुकीत कुकाण्यात पंकजाताईच्या सभेमुळेच तालुक्यात भरभरून मते मिळाल्याने आमदार विजयी झाले

पंकजाताईमुळे निवडणुकीत विजय झालेला असतांना राष्ट्रवादीने मला निवडुन आणले असे जाहीर सांगणारे आमदार मुरकुटे भाजपाचे निष्ठावान कसे होऊ शकतात असा सवाल करत गर्जे यांनी पंकजाताईंच्या नेवासा फाटयावरील सभेस गर्दी होऊ नये म्हणुन आमदारांनीच प्रयत्न केले ,सेना भाजपाची युती असतांनाही लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस –राष्ट्रवादीशी छुपी युती करत खासदार लोखंडेंना देवगावात मते मिळु नयेत म्हणुन कोणी प्रयत्न केले

जिल्हा परिषद निवडणुकीत कुकाण्यात भाजपाचा उमेदवार पराभूत करण्यासाठी व सोनईत युतीचा उमेदवार पराभुत करण्यासाठी अशा प्रकारे कार्यकर्ते बळी देण्यासाठी कोणा कोणाशी युती केली असे सवाल उपस्थित करून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सरसावलेल्या आमदार मुरकुटेंपासून पक्ष व निष्ठावानांना वेळीच सावध करण्यासाठी आम्हीच आता भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह केद्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहोत असे भाजपाचे पोपट जिरे, डॉ रावसाहेब फुलारी व अप्पासाहेब साबळे यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले