आम्ही दोन्ही राजे मुंडे भगिनींच्या पाठिशी : छत्रपती संभाजीराजे

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती संभाजीराजे हे प्रितम मुंडे यांना पाठींबा देण्यासाठी परळीत आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आम्ही दोन्ही राजे मुंडे भगिनींच्या पाठिशी उभे आहोत असं विधान केलं आहे.

बीडमध्ये भाजपकडून प्रितम मुंडे या वंजारी समाजाच्या, तर राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार आहेत त्यामुळे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जातीयवादी प्रचार सुरु आहे. ‘बीडमध्ये सध्या जातीचं राजकारण सुरु आहे. ते थांबवण्यासाठीच मी इथे आलोय’, असं ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माझे कौटुंबीक संबंध आहेत. प्रितम मुंडेंना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलोय. मराठा असणं हा अभिमान आहे पण जातीपातीचं राजकारण होऊ नये यासाठीच मी इथे आलोय, असं संभाजीराजे म्हणाले.

“गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आम्ही दोन्ही छत्रपती एकत्र आलो होतो. खा. छत्रपती उदयनराजेंचे मुंडे भगिनींवर प्रेम आहे म्हणून त्यांची भूमिका ही स्पष्ट आहे,” त्यामुळे आम्ही दोघेही मुंडे भगिनींच्या पाठीशी आहोत असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.