आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास तयार; परंतु, टाळी एका हाताने वाजत नाही- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

सोलापूर: राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. असे स्पष्ट सांगितले. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजप-सेनेची युती होणार का ? याबाबत संभ्रम आहे.

“आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहोत. परंतु, टाळी एका हाताने वाजत नाही. राज्यात भाजपाविरोधी वातावरण असल्याचे उद्धव ठाकरे सांगत असले तरी तसे कुठेही दिसत नाही. जिथे निवडणूक होतेय तिथे भाजपा जिंकत आहे. देशाला सुरक्षित ठेवायचे असेल तर काँग्रेसला बाजूला ठेवणे गरजेचे आहे” असे पाटील म्हणाले

चंद्रकात पाटील यांना ईव्हीएम घोळासंदर्भात प्रश्न विचारला असता ‘पंजाबमध्ये काँग्रेस निवडून आली आहे. तिथेही ईव्हीएमला दोष द्याल का? असे ते म्हणाले. तसेच त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला काँग्रेसच देशाची दुश्मन असल्याचा आरोप पाटील यांनी केला. ते शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत बोलत होते.