मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना विरोधकांकडून टार्गेट केले जात आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
“होय, आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे. साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता.”, अशी आठवणही रोहित पवार (rohit pawar) यांनी ट्वीट करत करून दिली आहे.
होय!
आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे!
साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता. pic.twitter.com/kGS3UnLd2V— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 18, 2022
राज्यात दंगल भडकवण्याच्या ISI च्या प्रयत्नांना उधळून लावत पवार साहेबांनी तेव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना? अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
१९९३ सालच्या मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्या.श्रीकृष्ण आयोगानेही पवार साहेबांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेत ‘This is the example of statesmanship’ अशा शब्दांत वाखाणणी केली. होय! म्हणूनच शरद पवार यांच्याखोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे. पण आज आग विझवण्याऐवजी भडकवणाऱ्यांना त्याची काय किंमत कळणार? असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “सत्ता गेल्याने पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न”, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
- “…यावर पवार कुटुंबीयांनी सखोल चिंतन करावं”, रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सदाभाऊंचे प्रत्युत्तर
- “मविआने वीज नाही पण विजेचा जबरदस्त धक्का…”, अतुल भातखळकरांचे टीकास्त्र
- धक्कादायक! भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
- “… ही जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक आहे”, संजय राऊतांची टीका