वुई आर नॉट पेपर टायगर्स, मुख्यमंत्र्यांचा सेनेला अप्रत्यक्ष टोला

 टीम महाराष्ट्र देशा : आपला पक्ष ‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ पर्यंत जाणारा पक्ष आहे. तो माध्यमांच्या भरवशावर चालत नाही. ‘.. वी आर नॉट पेपर टायगर्स’ मात्र काही नेते फक्त वर्तमान पत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वत:ला मोठे नेते समजतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते नागपुरातील कोराडी येथे आयोजित पूर्व विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 2014  मध्ये 17 कोटी मतदात्यांमुळे पक्ष केंद्रात 285 जागा जिंकून सत्तेत आला. 2019 च्या निवडणुकीत 40 कोटी मतदात्यांच्या पाठीब्यांने पक्ष पुन्हा सत्तेत येईल. भाजप कार्यकर्तेचे खरे ‘टायगर्स’ आहेत. तुम्ही जनतेत जाऊन काम करणारे लोकं आहात. मात्र काही लोक वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वत:ला मोठे करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आपल्या कामाबद्दल भ्रम पसरवण्याचे काम करत आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी तर्कशुद्ध माहितीच्या आधारे त्याला प्रत्युत्तर द्यावे. स्वामिनाथन समितीची अहवाल 2005 मध्ये येऊन ही तेव्हा मनमोहन सिंह, शरद पवार सारखे नेते गप्प बसले आणि आता तेच नेते शेतकऱ्याचे कैवारी बनून आंदोलन करीत आहेत.

उत्पादन खर्चावर 50  टक्के नफा देण्याची हिंमत मोदींनी दाखवली आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून हजारो कोटी देऊ केले, हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. सध्या देशभर विरोधी पक्षांच्या ऐक्याची चर्चा आहे. मात्र, त्याचे कोणतेही परिणाम भाजपवर होणार नाही. देवेगौडांनी नागपुरात, मुलायम सिंह यांनी धुळ्यात तर ममता बॅनर्जी यांनी नंदूरबारमध्ये प्रचार केला किंवा शरद पवार यांनी नागालँडमध्ये जाऊन सभा घेतली. 50 माणसे ही त्यांच्या पक्षाला मते देतील का, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला.

हे सर्व नेते आपापल्या क्षेत्राचे, तालुक्याचे, जिल्हयाचे फार तर राज्याचे नेते आहे. आसाम ते हिमाचल असा प्रभाव असलेला आणि सर्वाच्या मनी असलेले नेतृत्व सध्याच्या घडीला फक्त भाजपकडे आहे. नरेंद्र मोदी यांना संपूर्ण भारतात मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि 2019 ची लोकसभा निवडणूक आपणच जिंकू असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘आयुष्यमान भारत’मुळे देशातील 50 कोटी जनतेला मोठा दिलासा : देवेंद्र फडणवीस

सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान