‘आम्ही आगामी आयपीएल जिंकण्यासाठी आतुर आहोत’, ‘हा’ कर्णधार जिंकण्यासाठी सज्ज

विराट कोहली

मुंबई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत.

खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली. आयपीएलमधील मजबूत संघांपैकी एक असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराने आपण आगामी हंगामासाठी सज्ज असल्याचे बोलून दाखवले आहे. त्याने सोशल मीडियावरून संदेश पाठवत, आपला संघ आगामी हंगामात विजयी होईल, अशी आशा व्यक्त केली.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर असलेला डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून सनरायझर्स हैदराबाद संघाचे मैदानावर उतरत असतानाचे छायाचित्र शेअर करत लिहिले, ‘सनरायझर्स हैदराबाद एक विलक्षण संघ आहे. चाहते, कर्मचारी, खेळाडू आणि ग्राउंड स्टाफ हैदराबादमध्ये सर्व काही उत्कृष्ट आहे.

पुढच्या मोसमात मी संघाला विजेते बनवण्यासाठी आतुर आहे.’ डेव्हिड वॉर्नरच्या या पोस्ट नंतर सोशल मीडियावर आयपीएल चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएल सुरु होण्याआधीच जिंकण्यासाठी रस्सीखेच दिसत आहे. आयपीएलच्या या मोसमात कोणता संघ विजेता ठरणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या