महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध

टीम महाराष्ट्र देशा : ” राज्याला पावणे सात लाख कोटींच्या कर्जाच्या डोंगरात लोटण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. असा आरोप कामगार मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. नागपुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राऊत म्हणाले, ” राज्यावर सध्या पावणेसात लाख कोटींचे कर्जाचा जो बोजा निर्माण झाला आहे. तर राज्याला कर्जाच्या डोंगरात लोटण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाले आहे. तसेच, आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना जे वचन दिले आहे. ते वचन पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध असू. अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

कर्जाच्या डोहात बुडालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढून राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्याचे फार मोठे आव्हान महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे. यासाठी श्वेतपत्रिकेचा आधार घेतला जात असून, ती काढण्यासाठी मंत्रालयातील वित्त विभागात हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, राज्याच्या डोक्यावर सध्या पावणेसात लाख कोटींचे कर्ज आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणे, हे ठाकरे यांच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...