पुढील निवडणूका या ओबीसी आरक्षणासह होतील याचा आम्हाला विश्वास – जयंत पाटील

jayant patil

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुले राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

दरम्यान, ओबीसी समाजासाठी हा मोठा धक्का असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील यामुळे ओबीसी समाजाच्या अडचणी वाढणार आहेत. यामुळे भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजप आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मद्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील भाष्य केलं असून पुढील निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होतील असा विश्वास व्यक्त केलाय. ‘कोर्टाने जाहीर केल्यामुळे आता निवडणुका होत आहेत मात्र इतर निवडणूकांमधून मार्ग काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरचं मुख्यमंत्री बैठक घेतील. सध्या सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत त्यामुळे 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. मात्र पुढील निवडणूका या ओबीसी आरक्षणासोबत होतील असा आम्हाला विश्वास आहे. तसा आमचा प्रयत्न सुरू आहे. इतर राज्यात जो कायदा करण्यात आला आहे तसाच कायदा आम्ही देखील करणार आहोत. राज्य सरकारचे तसे प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या