fbpx

आम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची टर

टीम महाराष्ट्र देशा : भारताचा विकेट किपर रिषभ पंत आस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिकेपासून चांगलाच चर्चेत आला आहे.त्याने या कसोटीत उत्तम कामगिरी केली आहे.त्यासोबत रिषभ पंतला फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने बेबी सिटर होण्याचे चॅलेंज दिले होते आणि ते चॅलेंज त्याने स्वीकारले.त्यामुळेही पंत चांगलाच चर्चेत आला.आता मात्र यावरून भारतीय क्रिकेट पट्टूनींही टर उडवायला सुरवात केली आहे. रिषभ पंतने एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. तो फोटो रिट्विट करून रोहितने पंतची थट्टा उडवली.

”शुभ प्रभात बडी.. तु चांगला बेबी सीटर आहेस, असं मी ऐकलं आहे. आता आम्हाला बेबी सीटरची तातडीनं गरज आहे. तु असशील तर रितिकालाही आनंद होईल.” असे म्हणत रोहित शर्माने पंतची टर उडवली आहे.पंतने टाकलेल्या फोटोला रिट्विट करून रोहित शर्माने ट्विटरवर पोस्ट टाकली आहे.