आम्ही विधानसभेतही दुप्पट जागा मिळवू – आदित्य ठाकरे

aadity thakare1

मुंबईः मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेना विद्यार्थी संघटनेने भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) चा दारुण पराभव केला. शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेने १० पैकी १० जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आता आम्ही विधानसभेतही दुप्पट जागा मिळवू असे स्पष्ट केले.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळण केली. या विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘हा विजय म्हणजे विद्यार्थी आणि मतदारांनी शिवसेनेवर दाखवलेला विश्वास आहे. त्यामुळे २०१९मध्ये हाच गुलाल दिसणार’. तसंच पुढलं लक्ष्य हे विधानसभा असून तिथे डबलपेक्षा जास्त होऊ. सिनेट निवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला.