ग्रीन गोल्ड कंपनीच्या गोदामात आढळली १ लाख ८४ हजार विनापरवाना कापूस बियाण्यांची पाकीटे

bond aali

औरंगाबाद- लिंबेजळगाव येथे विनापरवाना कापूस बियाण्यांची तब्बल १ लाख ८४ हजार १८० पाकीटे गोदामात नुकतीच अढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे . या प्रकरणी शासनाच्या गुणनियंत्रक पथकाच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्यात २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याविषयी वाळूज पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, वाळूज लगत असलेल्या ग्रीन गोल्ड सिड्स कंपनीने विनापरवाना कापसाच्या बियाणाची पाकीटे वाळूज जवळील लिबेंजळगाव येथील गोडाऊनमध्ये ठेवली होती. सदर कंपनीत बियाणे तयार करण्यात येतात. या ठिकाणी विठ्ठल बीटी-२,गोल्ड सुर्या बिटी-२, कविता बीटी-२ आदी वाणाची बियाणे तयार करण्यात आली होती. सदरच्या बियाणाची वरील प्रमाणे पाकीटे ही लिबेंजळगाव येथील मंगलाबाई पडघण यांच्या मालकीचे गट क्रंमाक १९८ यामधील गोडाऊनच्या शॉप क्रंमाक १ मध्ये ठेवली होती.

सदरची पाकिटातील बियाणे हे कंपनीच्या परवान्यात समाविष्ट केलेली नव्हती. कापसाच्या बोंडअळीने शेतकरी चिंतामग्न तर शासनही यावर कठोर पाऊले उचलत आहे. त्या अनुषंगाने शासनाने कृषी विभागासह बियाणे निरीक्षक व गुणनियंत्रक विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या सत्रामध्ये दि.३ डिसेंबरला सदरच्या लिबेजळगाव येथील कंपनी गोडाऊनला गुणवत्ता नियंत्रक अधिकारी उदय देशमुख, पुणे येथील कृषी आयुक्तलयाचे मुख्य निरीक्षक पी. चंद्रकांत गोरडे, औरंगाबाद जि. प. कृषी विभागातील आंनद गंजेवार, गंगापूर प. स. समितीचे रामकृष्ण पाटील आदीच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.

सदरचे गोडाऊन चिखली अर्बन बॅकेकडे तारण असल्याने पथकाने बॅकेशी संपर्क साधून गोडाऊन तपासणी करायचे सांगून ते उघडावयास भाग पाडले. त्याचवेळेला सदरच्या गोडाऊनमध्ये वरील प्रकारची बियाणाची पाकीटे आढळून आली. या १८० पाकीटामधील ५२ पाकीटे पुढील प्रयोगशाळेत तपासणीकामी पथकाने सोबत घेतली आहे. या प्रकरणी शहराचे जिल्हा गुणनियंत्रक तथा बियाणे निरीक्षक आशिष काळुसे यांनी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूढील तपास पोनि.मुंकुद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...