वडशिवण्याच्या तलावात पाणी मीच आणणार : नारायण पाटील

करमाळा : कोळगाव धरणाचा भाऊंनी प्रस्ताव दाखल केला व मी उपसा सिंचन मी चालु केले.आज दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळ संपत आहे. वडशिवण्याच्या तलावात पाणी आणण्याच्या वल्गना अनेकांनी केल्या मात्र वडशिवण्याच्या तलावात पाणी मीच आणणार असा दावा करत केम येथे झालेल्या सभेत बागल गटावर टीकेची झोड आमदार नारायण पाटील यांनी उठवली.देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

करमाळा तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून सत्ताधारी जगताप गटाबरोबर आमदार पाटील तसेच मोहिते पाटील गटाने युती केली आहे.तर या युती समोर बागल आणि संजय शिंदे यांच्या गटाने आव्हान निर्माण केल्याने सध्या तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

आमदार नारायण पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

-बागलांच्या वैचारिक पातळी बालीशपणाची व किळस वाटणारी आहे.

– मार्केट कमिटीच्या जवळपास ७० वर्षाच्या कारकिर्दीत आजपर्यंत कसलाही भ्रष्टाचार झाला नाही. अतिशय पारदर्शक कारभार चालु आहे.

– आदिनाथ व मकाई कारखान्याची बागलांनी काय वाट लावली आहे हे तुम्हाला माहित आहे. शेतकऱ्यांच्या उसाची बिले, वाहतूकदारांची बिले, कामगारांच्या पगारी ३० माहिन्यापासून थकवल्या आहेत. आदिनाथ व मकाईवर जप्तीची वेळ या बागलांनी आणली अन् सोन्यासारखे कारखाने शेवटच्या घटका मोजत आहेत.

– भाऊंनी डीगा बागलांना प. स. चे सभापती केले पण त्यांनी स्वार्थापोटी भाऊंना दगा- फटका केला.

– जगताप गटाच्या संस्था बळकावण्याशिवाय काहीही बागलांनी काहीही केलेले नाही.