मुंबईत रस्त्यावरच नाही तर पाण्यातूनही चालणार टॅक्सी

मुंबईत रस्त्यावरच नाही तर पाण्यातूनही चालणार टॅक्सी

Water Taxi - Mumbai

मुंबई: मुंबई म्हणलं की तिथले रस्ते, रस्त्यावर असणारी ट्रॅफिक आणि त्यात गडबडीत धावत असणाऱ्या टॅक्सी हे एक समीकरण असल्यासारखेच आहे. ट्रॅफिकमध्ये तासंतास अडकून कधी एकदा आपापल्या घरी पोहोचतो असं प्रत्येक मुंबईकराला वाटत असतं. ट्रॅफिक होऊ नये त्याच सोबत लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक सुविधा देखील करण्यात आल्या आहेत. मात्र त्या देखील काही बाबतीत अपुऱ्याच पडतात. त्यामुळेच आता आणखी एक नवीन सुविधा मुंबईकरांना मिळणार आहे. आता पाण्यातून चालणाऱ्या टॅक्सीचा प्रवास मुंबईकरांना करता येणार आहे.

सध्या मुंबईकरांना नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गाचा आणि रेल्वेचा वापर करावा लागतोय. पण त्यात रोजचे काही तास घालवावे लागताहेत. त्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली ट्रॅफीकची समस्या प्रवाशांची डोकेदुखी वाढवत आहे. मात्र आता सुरू होत आहे वॉटर टॅक्सी (Water Taxi). येत्या १६ डिसेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सीची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दोन्हीकडे जेट्टी तयार करून ट्रायल रनही पार पडलं आहे. आता वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांचा तासांवरचा प्रवास मिनिटांवर येणार आहे.

वॉटर टॅक्सीमुळे मुंबई ते नवी मुंबई (Mumbai to New Mumbai) ४० मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे प्रवास आणखी सुंदर होणार आहे, त्याचबरोबर इंधनाची मोठी बचतही होणार होईल. मुंबईतील डोमेस्टीक क्रूज टर्मिनल प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा (Rajiv Jalota) यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या: