डॅशिंग खा.रणजितसिंहांचा धडाका, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी केलं बंद

टीम महाराष्ट्र देशा-  खासदार होताच बारामतीला जाणारं निरा डाव्या कालव्याचं पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या भागासाठी वळवणार, असं आश्वासन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंढरपुरात बोलताना माढ्यातील जनतेला दिलं होतं. माढ्यातील जनतेने त्यांना निवडून दिलं आणि नाईक निंबाळकरांनी देखील दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ ला करार बदलत बारामतीला ६० टक्के पाणी दिलं होतं. २०१७ मध्ये हा करार संपुष्टात आला होता. मात्र करार संपल्यानंतरही हे पाणी सुरूच होतं. अखेर नाईक निंबाळकरांनी पाठपुरावा करून हे पाणी बंद करण्यात यश मिळवलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारे निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. महाजनांनी याबाबत आदेश दिले असून दोन दिवसांत लेखी आदेश निघणार आहे.

Loading...

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायम स्वरुपी बंद होवून त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना १०० टक्के होणार आहे. दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खेळलेल्या चाणाक्ष खेळीने पवारांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील