पाणी पुरवठा विभागात भ्रष्टाचार- अजित पवार

नागपूर : राज्यातील पाणीपुरवठा विभागात चिरीमिरी दिल्याशिवाय टेंडरच मंजूर होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अजित पवार यांनी केला.विधानसभेत आज, सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुक्ताईनगर-बोदवड-वरणगाव या भागातील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबतचा मुद्दा भाजपचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

त्यावेळी सदरचे काम चार-पाच महिने झाले तरी त्याला सुरुवात करण्यात आले नसल्याचा उल्लेख खडसे यांनी केला. त्यावेळी अजित पवार यांनी हाच धागा पकडत पाणीपुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेत चिरीमिरी घेतल्याचा आरोप केला.

दरम्यान आमदार एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आगामी 15 दिवसामध्ये याबाबत चौकशी करुन काम सुरु करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले.लोणीकर यांच्या उत्तरात दिरंगाई दिसत असल्याचे अजित पवार यांनी सरकारच्या कामकाज पध्दतीवर हल्ला चढविला.सत्ताधारी बाकावरील सर्व आमदार जाणीपूर्वक शांत बसले आहेत. बोलण्यास त्यांची अडचण होत आहे.

मात्र पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून 15 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र इतर आमदारांच्या कामांचे काय, असा सवाल करत त्या विभागात चिरीमिरी देत असल्याचा आरोप केला.

You might also like
Comments
Loading...