जायकवाडी धरणाचे ९ वर्षांनी उघडले दरवाजे

नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

वेब टीम :राज्यभरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीअसून राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरली आहेत . गोदावरी नदीवर असलेले जायकवाडी धरणही शुक्रवारी सकाळी पूर्ण भरत आल्याने आता या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
जायकवाडी धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले आहेत. त्यामधून १० हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदवारी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नदीपात्रात कोणीही जावू नये, जनावरं, वाहनं पात्रात घेवून जावू नयेत, याबाबत सर्वांना सुचना करण्यात आलीये. दरम्यान, धरणात अजूनही पाण्याची आवक सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढल्यास नऊ आपातकालीन दरवाजेही उघडण्यात येतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...