fbpx

मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी कोकणातून जाणार पाणी

टीम महाराष्ट्र देशा : यंदा राज्यात पावसाने उशिरा सुरवात केली आहे. त्यामुळे राज्याच्या अजूनही काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. मराठवाड्यात देखील अशीच काहीशी भीषण परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्याला आणि सामन्य माणसाला वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे या भीषण परिस्थितीवर उपाय म्हणून कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातूनपाणी वळविण्याच्या योजनांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला आहे.

कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचून तहानलेल्या मराठवाड्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावरील चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील कार्यवाही करण्यास तत्त्वत: मान्यता दिली.

महत्वाच्या बातम्या

फक्त ४ नाही तब्बल ५० आमदार भाजपच्या संपर्कात : महाजन

शिवेंद्रराजेंच ठरलं ! विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला राजीनामा

करमाळ्यात बँकेचा स्लॅब कोसळला; २५-३० जण ढिगाऱ्याखाली अडकले