एसटीला आषाढीतून मिळणाऱ्या लाखोंच्या उत्पन्नावर कोरोनामुळे पाणी!

औरंगाबाद : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त औरंगाबाद विभागातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वारकर्‍यांना पंढरपूरला जाण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यंदाही एसटीतून वारीला जाता आले नाही. दुसऱ्या वर्षी एसटीला लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. याची माहिती एसटी विभागाद्वारे देण्यात आली.

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची पायी वारी करणाऱ्या भक्तांबरोबरच एसटी बसनेही पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी असते. अनेक जण पायी जाणे होत नसल्याने एसटीने पंढरपूरची वारी करतात. तर काही वारकरी मंडळी स्वतंत्र बस बुक करुन देखील पंढरपूरी जातात. आषाढीनिमित्त औरंगाबाद विभागात सुमारे शंभर ते सव्वाशे बसेस पंढरपूरला जातात. दरवर्षी हे चित्र असायचे परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात खंड पडला आहे. एसटी महामंडळाला यातून मिळणारे लाखोंचे उत्पन्न बंद झाले आहे.

मराठवाड्याचा कानाकोपऱ्यातून वारकरी दर्शनासाठी जात असतात. कोणी पायी दिंडीने जातात. तर काही जण एसटीने प्रवास करतात. तर काही एसटीने. वारकऱ्यांची संख्या दरवर्षी सहा हजारांच्या जवळपास असते. गेल्या वर्षी आषाढी एकादशीला जाण्यास परवानगी मिळाली नाही. यावर्षी परवानगी मिळेल असे वाटत असतानाच याही वर्षी बंदी घातल्याने सुमारे सहा हजार वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाला जाता आले नाही. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला यामुळे लाखोंचे नुकसान सोसावे लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP