fbpx

पाण्याची मागणी २०३० पर्यंत उपलब्धतेपेक्षा दुप्पट; समस्या गंभीर होण्याचे संकेत

neeti-ayog

सह्याद्री वृत्त सेवा / भा.वृ.सं. : देश इतिहासातील सगळयात मोठया जल समस्येचा सामना करत आहे. भविष्यात याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे देशात प्रभावी जल व्यवस्थापनाची गरज असल्याचे मत निती आयोगाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील पाण्याची स्थिती गंभीर असून, सन २०३० मध्ये देशातील पाण्याच्या उपलब्धतेपेक्षा दुप्पट पाण्याची गरज असणार आहे. सध्या देशामध्ये ६०० दशलक्ष नागरिक पाण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. तर सुमारे २ लाख लोकांचा स्वच्छ पाण्या अभावी मृत्यू होत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

तसेच सन २०५० पर्यंत देशातील पाण्याची गरज १,१८० बीसीएम इतकी अपेक्षित असून, सध्या आपल्याकडे ६९५ बीसीएम इतके पाणी उपलब्ध आहे. ही क्षमता सुमारे ११३७ बीसीएम पर्यंत वाढू शकते, असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर निती आयोगाने सुयंक्त जल व्यवस्थापन निर्देशांक विकसीत केला आहे. त्याचा उपयोग राज्यांमध्ये प्रभावी जल व्यवस्थापनासाठी केला जाईल, असे ही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

1 Comment

Click here to post a comment